महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुध्द गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुध्द गुन्हा दाखल

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज) : गोठ्यात बेडवर झोपलेल्या एका 43 वर्षीय महिलेची साडी ओढून  मनाला लज्जावाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी तानाजी बाबासाहेब जाधव (रा.सलगर बु॥) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील 43 वर्षीय फिर्यादी महिला दि.10 एप्रिल रोजी हातउसणे दिलेले पैसे आरोपीकडे मागितले होते. आरोपीने सलगर येथील विदर्भ कोकण बँक या शाखेचा चेक फिर्यादीस दिला होता. आरोपीने फिर्यादीस भेटून सांगितले की, मी सांगितल्याशिवाय चेक जमा करु नका. मी सांगेल तेव्हांच बँकेत जमा करा म्हटल्यावर दि.7 मे रोजी सकाळी 9.30 वाजता फिर्यादीने पैशाची गरज असून तो चेक बँकेत टाकणार असल्याचे सांगून राहते घरी त्या गेल्या. सकाळी 11 वाजता फिर्यादी ही जनावर्‍याच्या गोठ्यात बेडवर झोपली असताना आरोपीने तेथे येवून फिर्यादीची साडी ओढू लागला. यावर फिर्यादीने साडी का ओढतोस असे म्हणताच त्याने पुन्हा ब्लाऊज ओढून फाडला व शिवीगाळ करीत  मनास लज्जावाटेल असे कृत्य केले. या दरम्यान फिर्यादीने आरडाओरडा करताच आरोपीने तिच्या पोटावर लाथ मारुन निघून जाताना तू घडला प्रकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर बघून घेण्याची धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.