सोलापूर जिल्हा धर्मदाय संस्थेच्या वतीने मोफत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे २९ रोजी आयोजन..
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर( पंढरी नगरी न्यूज) सोलापूर जिल्हा धर्मदाय संस्थेच्या वतीने मोफत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दिनांक 29 मे रोजी आयोजित केले असल्याची माहिती सोलापूरचे धर्मदाय उपा आयुक्त एसडी कंकणवाडी यांनी दिली. २९ मे रोजी सायंकाळी ६:४५ वाजता जुळे सोलापूर येथील गिरिजाबाई ढोबळे शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या जनावर हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे धर्मदाय आयुक्त नरेंद्र महाजन यांच्या संकल्पनेतून सर्व धर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे ,या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वधूवरांना कपडे मंगळसूत्र जोडवी संसार उपयोगी भांडी अन्नधान्य तसेच वधू-वरा सोबत आलेल्या वराडी मंडळीसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यासाठी धर्मदाय आयुक्त सोलापूर कार्यालयातील कर्मचारी या सर्व धर्मीय सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहेत जिल्ह्यातील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीसाठी अंतिम दिनांक २१ मे पर्यंत इच्छुकांनी आपली नावे डॉ.राजेंद्र गाजूल ७०२०५१५०१२, अभिजीत ढोबळे ८२०८७०२६०२, शंकर चौगुले ९४२२०६८३६३, निरंजन बोदल ८४२११३८७७७ , राजू राठी ९८२३०९४५७८, अशोक वाघमारे संतोष कवडे ९८५० २५ ३६०१, यांच्या फोन नंबर वरती संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत असे आवाहन माहिती धर्मादाय उपायुक्त एस. डी. कंकणवाडी यांनी केले आहे .