पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर दहावी, बारावी वर्गाचा १०० टक्के निकाल
------------------------------------------------------------------------------------
तुळजापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ ,नवी दिल्ली (सी. बी .एस. ई ) द्वारा घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च २४ या दहावी व बारावी वर्गाचे निकाल आज सोमवार दिनांक १३/ ५/२०२४ रोजी जाहीर झाले. यामध्ये पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर दोन्ही वर्गाचे १००% निकाल लागले असून बारावी वर्गात प्रथम क्रमांक: कु. ज्ञानेश्वरी सुंदर भोरे ९१.२, द्वितीय क्रमांक: कु.कल्याणी दादासाहेब काकडे ८८.०० तृतीय क्रमांक: श्रेया कुमार जाधव ८६.४ तर दहावीच्या वर्गात प्रथम क्रमांक: कु. अस्मिता आगलावे ९७.६, द्वितीय क्रमांक: जगदीश जाधव ९७.४ तृतीय क्रमांक: कु. स्नेहा कवडे ९६.८ या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे.
या विद्यार्थ्यांना सूर्यकांत गायकवाड, सचिन खोब्रागडे, विलास राऊत, अमित गद्रे , प्रमोद खरबास, यश पाटील, रवींद्र अलसेट, चक्रपाणि गोमारे, वैभव कुलकर्णी, सुजाता कराड, हरी जाधव या तज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन लाभले होते. दहावी मध्ये मराठी विषयात १०० पैकी १००, गुण ११ विद्यार्थ्यांना, तर गणित विषयात १०० पैकी १०० गुण २ विद्यार्थ्यांना मिळाले. बारावी विज्ञान शाखेचे३७ विद्यार्थी तर दहावीसाठी ८१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते .
या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे चेअरमन,धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, प्राचार्य श्री गंगाराम सिंह, नवोदय विद्यालय परिवार, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, नवोदय पालक समितीचे सर्व सदस्य या सर्वांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील यशासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.