न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.95%

न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.95%

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2024 इयत्ता दहावी या परीक्षेचा न्यू इंग्लिश स्कूल ,भाळवणी तालुका पंढरपूर. या विद्यालयाचा निकाल 97.95 %लागला आहे .या परीक्षेसाठी एकूण विद्यालयातून 244 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्या पैकी 239 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यावेळी विशेष प्रावीण्य - 98 विद्यार्थी प्रथम श्रेणी - 68 विद्यार्थी द्वितीयश्रेणी - 52 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी- 21मिळवून उत्तीर्ण झाले आहे. या विद्यालयातून प्रथम क्रमांक पासले प्रतीक्षा देविदास- 96.20% द्वितीय क्रमांक- झांबरे प्रणाली संजय - 96.00 %तृतीय क्रमांक निराळी शांभवी नागनाथ - 94.60% गुण मिळवून यश संपादन केले आहे. 

वरील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे स्कूल कमिटी अध्यक्ष संभाजी शिंदे, प्राचार्य. गायकवाड एन.एम., पर्यवेक्षक रोकडे व मार्गदर्शक विषय शिक्षक .तसेच भाळवणी ग्रामपंचायतीचे सरपंच रणजित जाधव, उपसरपंच नितीन शिंदे व सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थ तसेच पालकांमधून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.