वाळूचे जप्त वाहन सोडन्यासाठी पाच हजाराची लाच स्विकारताना मंगळवेढा प्रांतकार्यालयातील दाेघे लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडले मंगऴवेढ्यात तीन आठवडयात दोन घटना , लाचप्रकणाच्या घडल्याने लाच स्विकारण्यात महसुल विभाग ठरला अव्वल ....
-----------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज ) वाळू व्यवसायात सांगोला तहसील कार्यालयाने केलेल्या कारवाईतील जप्त वाहन सोडण्यासाठी प्रांत कार्यालयातून परवानगी देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपये लाच स्वीकारताना मंगळवेढा प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार प्रकाश विश्वनाथ सगर (रा.भुसणे ता.उमरगा जि.धाराशीव) व महसूल सहाय्यक विवेक ढेरे (वय 32,रा.इचलकरंजी ता.हातकणंगले) याला लाच लुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान तीन आठवड्यात दोन वेळा महसुल कर्मचार्यांनी लाच स्विकारल्याने मंगळवेढ्यात लाच स्विकारण्यात महसूल खाते अव्वल ठरले आहे.त्या मंडल अधिकार्याला अदयाप जामीन मिळाला नसताना चक्क नायब तहसीलदारच कारागृहात गेल्याने महसूल खात्यामध्ये खळबळ उडाली आहे.
या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, सांगोला तहसील कार्यालयाने अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करत टाटा मेगा वाहन सन 2020 साली पकडले होते.त्या जप्त वाहनावर 1 लाख 37 हजार 684 इतका दंड आकारण्यात आला.सदर दंडाची रक्कम भरल्याने वाहन सोडण्याकरता प्रांत कार्यालयाची परवानगी आवश्यक होती सदरची परवानगी देण्यासाठी तक्रारदाराने प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी वाहन सोडण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपये निश्चित करून पाच हजाराची लाच स्वीकारण्यात आली. सदरची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार प्रकाश विश्वनाथ सगर व महसूल सहाय्यक विवेक ढेरे यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले ही कारवाई सोलापुर लाचलुचपतच्या विभागाने केली आहे..महसूल
कार्यालयाकडून त्यांच्या कामासाठी आलेल्या जनतेला छळण्याचे प्रकार सुरूच असून गतवर्षी याच कार्यालयात राष्ट्रीय महामार्गासाठी बाधित जमीनीचा मोबदला देण्यासाठी चक्क तलाठयाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी तलाठ्यावर कारवाई करून वरिष्ठ अधिकार्याला मोकळे सोडण्यात आले. तर गत आठवड्यात तहसील कार्यालयातील मंडल अधिकार्याला लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.या मंडल अधिकार्याला अदयापही जामीन मिळाला नसून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ही घटना ताजी असतानाच आज शुक्रवारी प्रांत कार्यालयात थेट नायब तहसीलदार व महसूल सहायक लाच प्रकरणात लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात सापडल्याने अधिकारी ते कनिष्ठ कर्मचार्यापर्यंत लाच स्विकारण्यात साखळी निर्माण झाली असल्याचा संशय सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. परिणामी लाच लुचपत विभागाने भ्रष्ट कारभार खोडून काढण्यासाठी कार्यालयातील मूळापासून ते शेंडयापर्यंत सगळयांची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी व शासनाची कार्यालये भ्रष्टमुक्त करावीत अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सध्या महसूल विभागाकडून तालुक्यातील जनतेला छळण्याची परिसीमा गाठली आहे. यापुर्वीही पुरवठा निरिक्षक व खाजगी इसम स्वस्त धान्य दुकानदारांना आर्थिक दृष्टया छळताना जेरबंद झाला होता. लाच स्विकारण्याची घटना घडल्यानंतर शक्यतो कर्मचारी हा वरिष्ठांच्या आशीर्वादाने लाच स्विकारत असल्याने एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांचीही लाचलुचपतच्या वरिष्ठ अधिकार्यांनी गांभिर्यपूर्वक चौकशी करून दुधाचे दुध, पाण्याचे पाणी करावे असे मत व्यक्त या घटनेवरून व्यक्त होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांचा काना डोळा होत असल्यानेच हाताखालचे कर्मचारी लाच स्विकारण्याचे धाडस करीत आहेत. यामध्ये वरिष्ठ आधिकार्याची जबाबदारी येत आसल्याने त्याचींही चौकशी होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गात तर आमचा हक्कच समजून टक्केवारी घेतल्या शिवाय बाधीत शेतकर्यांना पैसेच दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.सोलापुर येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयानेच सवय लावल्याने लाललुचत विभागाने येथेही आपली करडी नजर ठेवुऩ संबधीतांना जेरबंद करून शेतकर्यांना त्यांच्या जाचातून मुक्त करावे अशी मागणी होत आहे.
या कार्यालयात अंधाधुंद कारभार सुरु असून येथे वरिष्ठ अधिकारी महिन्यातून कितीवेळा हजर राहतात हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. येथील कार्यालय हे एका खाजगी इमारतीमध्ये भरत असल्याने आवो -जावो घर तुम्हारा... अशी परिस्थिती या कार्यालयाची सध्या आहे.विजापूर रोडवर असलेल्या कार्यालयात कॉन्ट्रॅक्ट पध्दतीवर असलेल्या कर्मचार्यांचा भरणा अधिक असून एका सेवानिवृत्त व वयोवृध्द कर्मचार्याच्या हातात या कार्यालयाचा कारभार दिल्याने शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक होत असून त्यांच्या मनाला आले व टक्केवारी दिली तरच बाधित शेतकर्यांचा मोबदला मिळतो. अन्यथा त्या शेतकर्यांना मोबदल्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे.दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात लक्ष घालून स्वच्छता मोहिम राबवून भ्रष्टाचारमुक्त कार्यालय करावे अन्यथा लाच लुचपतच्या जाळयात अडकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा नागरिक व शेतकर्यांतून ऐकावयास मिळत आहे.