मुंबईत ४० लाखाचे दागीने चोरनाऱ्या चाेरट्याला १७ वर्षांनी अटक गुन्हे प्रगटीकरण शाखेची मोठी कारवाई

मुंबईत ४० लाखाचे दागीने चोरनाऱ्या चाेरट्याला १७ वर्षांनी अटक  गुन्हे प्रगटीकरण शाखेची मोठी कारवाई

------------------------------------------------------------------------------------

मुंबई(, दै.पंढरी नगरी न्यूज ) कुठल्याही आरोपीची कायद्याच्या चौकटीतून सुटका नसते. आरोपीने केलेल्या कृत्याचे पितळ कधी ना कधी उघड होतच असतं. अशाच एका गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांनी यश आले आहे. मात्र, या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यास पोलिसांना तब्बल 17 वर्ष लागली आहे. ही घटना आहे मुंबईतील मीरा रोड आणि नालासोपारा इथल्या ज्वेलर्सच्या दुकानातील चोरीची. 17 वर्षापूर्वी नालासोपारा येथील ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन पाच जणांच्या टोळीने चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. यात त्यांनी तब्बल चाळीस लाखांचे दागिने लंपास केले होते. त्यानंतर यातील आरोपीने तब्बल 17 वर्ष पोलिसांना गुंगारा देत पळ ठोकला होता. अखेर पोलिसांनी यातील मुख्य आरोपीला हिंगोली येथील भांडेगाव येथून अटक केली आहे.

आरोपीला 17 वर्षा नंतर अटक  

जॉनी उर्फ जनार्धन वाघमारे असं या संशयित आरोपीचे नाव आहे. याला पोलिसानी हिंगोली येथील भांडेगाव येथून अटक केली आहे. जॉनी उर्फ जनार्धन वाघमारे हा 13 गुन्ह्यातील आरोपी होता. परिणामी तो मागील 17 वर्षापासून फरार होता. त्याने मीरा रोड आणि नालासोपारा येतील ज्वेलर्स मध्ये दरोडा टाकत त्यात त्याने चाळीस लाख दहा हजाराचे सोने लंपास केले होते. मुकेश नामालाल जैन यांच्या नालासोपारा येथील ज्वेलर्सचा दुकानात जाऊन पाच जणानी मुकेश जैन यांना धमाकावून त्यांचे हाथ पाय बांधले. त्यानंतर त्यांना खोलीत कोंडून ठेवले आणि दुकानातील सोने लुटून घेऊन गेले.

गुन्हे प्रगटीकरण शाखेची कारवाई 

घटना घडल्यानंतर या बाबत मुकेश यांनी नालासोपारा पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता नालासोपारा पोलिसानी चार आरोपीना अटक केली होती. वसंत चांगदेव म्हात्रे, बायनबाई रामराव वाघमारे, कुसुम दिलीप कोरडे, इंदुबाई दत्ताराव लोबणे, दिपक जगदीश रोडा अशी या चौघांची नावे असून यांना पकडण्यात नालासोपारा पोलिसांना या पूर्वीच यश आले होते. मात्र या प्रकरणातील मुख्यसूत्रधार जॉनी उर्फ जनार्धन हा मागील 17 वर्षापासून फरार होता. अखेर आज त्याला नालासोपारा पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने जेरबंद करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.