हुतात्मा स्मारक वाचनालय सोलापुर येथे स्वातंत्र्य दिन साजरा...

हुतात्मा स्मारक वाचनालय  सोलापुर येथे स्वातंत्र्य दिन  साजरा...

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज) हुतात्मा स्मारक, हुतात्मा सार्वजनिक वाचनालय, सोलापूर, जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. सेवानिवृत्त सीआयएसएफ( एएसआय) राठोड एम. आर. यांचे शुभहस्ते ध्वजावंदन करण्यात आले. हुतात्मा स्मारकात ध्वजावंदन करण्याचे भाग्य लाभल्याने मी स्वतःला भाग्यशाली समजतो असे मत त्यांनी मांडले. वाचनालय लोकाभिमुख झाली पाहिजेत. वाचनालयात असलेला पुस्तक रुपी खजिना सर्व वाचकांनी मनसोक्त उपभोगला पाहिजे, असेही मत त्यांनी मांडले. प्रास्ताविकात वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी स्मारकाच्या इतिहासाला उजळणी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल वृषाली हजारे यांनी केले तर आभार लिपिक सारिका माडीकर यांनी मानले. यावेळी सेवक गीतांजली गंभीरे, निखिल पवार, प्रज्वल पाटील, तेजू चव्हाण, संचालक धोंडीबा बंडगर, संचालिका सारिका मोरे, रोहित फुटाणे, इस्माईल शेख, प्रतीक नकाते, शंकर कस्तुरी, संजय पारसवार, आय.के. शेख ,अनिकेत सिंग, रोहित राम, रहिमान शेख, कृष्णा शेट्टी यांच्यासह बहुसंख्य वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.