कासेगांवच्या ग्रामपंचायत सरपंचपदी वसंत (नाना )देशमुख गटाच्या रिजवान भालदार

कासेगांवच्या ग्रामपंचायत सरपंचपदी वसंत (नाना )देशमुख गटाच्या रिजवान भालदार

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्युज): पंढरपूर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कासेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पांडुरंग कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन तथा कासेगाव जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या गटाच्या असणाऱ्या रिजवान भालदार यांची सरपंच पदी करण्यात आली देशमुख गटाच्या सुनंदा भुसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने  सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी रिजवान भालदार तसेच विरोधी गटाकडून पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे गटाच्या सुमन लिंगे यांनी अर्ज दाखल केला होता परंतु देशमुख गटाच्या रिजवान भालदार यांना १७ पैकी ११ मते मिळाली तर सुमन लिंगे  यांना ५ मिळाली . रिजवान भालदार या  ११ मते मिळवून सरपंचपदी विजयी झाल्या ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या गटात नुकताच प्रवेश केला होता.

विजयसिंह देशमुख यांनी निवडणूक बिनविरोध करण्याऐवजी सरपंच पदाच्या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या गटाच्या सुमन लिगे यांना उभे केले होते परंतु सुमन लिंगे यांना या निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले .माजी सभापती विजयसिंह देशमुख यांचे चिरंजीव अजितसिंह देशमुख यांचा कासेगाव ग्रामपंचायत झालेल्या गत पंचवार्षिक निवडणुकीतही मोठ्या मताच्या फरकाने पराभव झाला होता. त्यांना हा पराभव जीवावरी लागला होता. मतदाराने त्यांचा  टांगा पलटी झाला होता. त्यानंतर आता विजयसिंह देशमुख यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून सुमन लिंगे यांना सरपंच करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले परंतु या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झाला. कासेगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच संग्राम सिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कासेगाव मंडल अधिकारी बाळासाहेब मोरे यांनी काम पाहिले.

यावेळी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे  विद्यमान संचालक तथा कासेगाव जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शेख कासेगाव चे युवक नेते आबासाहेब देशमुख , ग्रामपंचायत सदस्य हंसराज देशमुख, प्रकाश रुपनर, अनिता जाधव, हरिभाऊ फुगारे , सुनंदा भुसे, गौरी वाघमारे, पीर जमादार, औदुंबर निकम, सिद्धेश्वर खिलारे, दीपक जाधव इत्यादी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते .निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.