लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये श्री संत दामाजी कॉलेजची विद्यार्थिनी कु.प्रज्ञा फटे हिचे उज्वल यश संपादन
---------------------------------------------------------------------------------
प्रज्ञा फटे हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज ) : तालुक्यातील फटेवाडीसारख्या ग्रामीण भागातील प्रज्ञा दगडू फटे ही विद्यार्थीनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये ९०० पैकी ५२७:७५ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींमध्ये ३९ वी येवून तिने उज्वल यश संपादन केले आहे. प्रज्ञा फटे यांचे वडिल दगडू फटे हे संत दामाजी सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यालय अधिक्षक या पदावर कार्यरत आहेत .फटेवाडी सारख्या ग्रामीण भागातुन शेतकरी कुटुंबातील प्रज्ञा फटे हिने पुणे येथे लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची मागील दोन वर्षापासून तयारी करीत असताना २०२० साली आलेल्या कोरोना सारख्या महामारीत सुध्दा मोठया जिद्दीने लाँकडाऊनच्या काळात पुणे सारख्या शहरात राहून मोठया धैर्याने व जिद्दीने अभयास केला. प्राथमिक, मुख्य व तोंडी अशा तीनही परिक्षामध्ये तिने पहिल्या प्रयत्नात यश मिळवले आहे. प्रज्ञा हिचे प्राथमिक शिक्षण फटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण श्री संत दामाजी हायस्कूल मध्ये दिलीप मानेसर, सिध्देश्वर राजमाने सर, सुरेश कोडग सर, राजेंद्र जाधव सर, सोपान चव्हाण सर,संजय कटटे्सर, भिमराव मोरे सर यांचे मार्गदर्शनाखाली झाले. दामाजी हायस्कुलच्या शिक्षकांच्या प्रेरणेतुन तिने राज्यसेवेत काम करणेचा निर्णय घेवुन त्यादृष्टीने सुरुवात केली. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा येथे शिक्षण घेत असताना राजेंद्र नागणे व निहाल पटेल सर, रामजी आवताडे सर, विश्वनाथ ढेपे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर फर्ग्युसन काँलेज, पुणे येथे पदवीचे शिक्षण घेत असताना शेवटच्या वर्षी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा फाùर्म भरला होता.
यामुळे मुलींना उच्च शिक्षण देण्याचा ग्रामीण भागात कल वाढताना दिसत आहे. मुलींची शिक्षणाची ओढ ओळखून दगडू फटे यांनी मुलींना उच्च शिक्षीत केले तिच्या या उज्वल यशाची बातमी आई- वडिलांच्या कानांवर पडताच पोरीच्या कौतुकाने ते कृतार्थ झाले प्रज्ञा हिने जरी हे यश संपादन केले असले तरी हे यश तिला सहजासहजी मिळालेले नाही. अखंड परिश्रम, तपश्चर्या, जिदद् चिकाटी, पाच वर्षे आपल्या कुठुंबापासून दूर राहून तिने ह्या यशाला गवसणी घातलेली आहे.
मंगळवेढा येथे माद्यमिक व उच्चमाद्यमिक शिक्षण घेत असताना उर्मिला (काकु)राजमाने यांचेकडे खोली करुन तिने अभयास केला तिचे वडिल श्री दगडू फटे हे कारखान्यावर येतांना तिच्यासाठी जेवणाचा डबा घेवून यायचे तसेच प्रज्ञा फटे यांचे आजोबा स्व:बाबासाहेब फटे हे दर सोमवारी आपल्या लाडक्या नातवंडासाठी आवर्जुन खाऊ घेवून येत असत आपली लेक आपल्या घराचे, गावाचे नांव उज्वल निश्चीत करेल याची त्यांना आशा होती परिस्थिती बेताचीच होती. परंतु प्रज्ञाचे गुणवत्तेमुळे फर्ग्यसन काùलेज येथे बीएस्ससी चे शिक्षण घेत असताना तिला इनस्पायर स्काँलरशिप मिळाली या स्काँलरशिपमधून तिला एक पेरणा मिळाली स्काँलरशिपमुळे पुढील शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळाला कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी जिद्द असावी लागते आणि ही जिद्द प्रज्ञा हिने दाखविली आणि ही तिची जिदद्च तिला यशोशिखरावर घेवून गेली आज तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होते आहे.
तिच्या यशाबध्द्ल धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, शोभाताई काळुंगे, दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हाचेअरमन तानाजीभाऊ खरात, सर्व संचालक मंडळ, प्रादेशिक उपसंचालक सोलापुरचे पांडुरंग साठेसाहेब, कार्यकारी संचालक सुनिल दळवी, सहकार शिरोमणीचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे, दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, फटेवाडीचे युवकनेते रावसाहेब फटे, माजी उपनगराध्यक्ष श्चंद्रकांत पडवळे, अविनाश शिंदे, फटेवाडीच्या सरपंच सिमाताई प्रकाश काळुंगे, उपसरपंच पल्लवी दिगंबर शिंदे, दामाजीच्या माजी संचालिका कविता निकम, लक्ष्मीकांत मर्दा, किरण शहा संजय फटे, संभाजी इंगोले, गजानन चव्हाण,भारत पवार, प्रकाश घुले, छत्रपती परिवारचे सुरेश पवार गुरुजी, विठठल काटकर सर, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठठल गायकवाड, पतसंस्थेचे चेअरमन, विश्वास सावंजी कारखान्यातील सर्व खातेप्रमुख कामगार, पत्रकार बाळासाहेब नागणे, संभाजी नागणे, समाधान फुगारे यांनी अभिनंदन केले.