नवभारत प्रतिष्ठान च्या वतिने संविधान दिनानिमित्त रावगांव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन..!
-----------------------------------------------------------------------------------
रावगांव (दै पंढरी नगरी न्यूज) : रावगांव ता. करमाळा येथील नवभारत प्रतिष्ठान यांच्या मार्फत संविधान दिन (२६ नोव्हेंबर )ते भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिन (६ डिसेंबर) या कालावधीत समता पर्व साजरा होत आहे. त्या अनुशंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सामूहिक संविधान वाचन, शालेय विद्यार्थ्याची प्रभात फेरी, संविधानावर आधारीत निबंध स्पर्धा, संविधान प्रस्ताविका प्रतिचे वाटप इ. कार्यक्रम घेण्यात आले .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावगाव येथे शालेय विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, यावेळी महेंद्र शिंदे, वैशाली महाजन, राऊत गुरूजी यांचे सहकार्य लाभले तसेच, अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय या कार्यालयात संविधान उद्देशिका व नागरिकांची मूलभूत कर्तव्य अनुच्छेद ५१ क या प्रतिंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास महेंद्र शिंदे, वैशाली महाजन, माजी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाजी शिंदे, आम आदमी पार्टीचे प्रशांत शिंदे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष बप्पा शिंदे, प्रकाश कांबळे, राहूल पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी बरडे, पोपटराव बुधवंत, राजेंद्र बुधवंत, हर्षद मोरे, जलाल शेख, आण्णासाहेब राजेभोसले इ. उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्हा प्रकल्प अधिकारी (बार्टी) सोनकांबळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आभार भास्कर पवार यांनी मानले.