काकानेच चार वर्षीय चिमुकलीचा खून करून सीना नदीत दिले फेकून

काकानेच चार वर्षीय चिमुकलीचा खून करून सीना नदीत दिले फेकून

---------------------------------------------------------------------------------

मोहोळ( दै.पंढरी नगरी न्यूज) : जमिनीच्या वादातून धाकट्या भावानेच थोरल्या  भावाच्या चार वर्षीय मुलीचा फोन करून मृतदेह सिना नदीच्या पत्रात फेकूनदिल्याची खळबळ जनक घटना मोहोळ तालुक्यातील डिसकळ येथे घडली ,मुलीचे वडील यशोधन शिवाजी धावणे यांनी मोहोळ पोलिसात आरोपीच्या विरुद्ध तक्रार दिली आहे.

डिसकळ येथील यशोधन शिवाजी धावणे ही आई वडील पत्नी मुलगी ज्ञानदा व डॉक्टर बाबू यशोदीप हे एकत्रित राहत होती यशोधन व यशोदीप धावणे राहणार डिसकळ या दोन सख्ख्या भावांमध्ये वडिलोपार्जित पाच -पाच एकर एकर स्वतंत्र शेती होती परंतु उर्वरित सहा एकर जमीन आईचे नावावर होती आईच्या नावावरील सहा एकर शेती स्वतःच्या नावे करण्यासाठी धाकटा भाऊ यशोदीप यांचा थोरला भाऊ यशोधन यांच्यासोबत वारंवार जमिनीच्या कारणावरून वाद होत होता.

दिनांक २१ रोजी सकाळी ७ च्या सुमारास याच कारणावरून आगमना धरून तो तुझी बायकोच याला जबाबदार आहे. असे रागाने भांडत तुमचा वंश शिल्लक ठेवणार नाही अशी धमकी यशोधपणे दिली होती आम्ही नवरा बायको शेतामध्ये कामासाठी गेलो आम्ही घरी नाही हे पाहून आरोपी यशोदीपने माझी मुलगी ज्ञानदा   हिला झोपेतून उचलून नेऊन तिला खून करून मारून मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात पाण्यात टाकून दिले त्यामुळे डिसकळ गावामध्ये व परिसरामध्ये लहान वयाने असणाऱ्या ज्ञानदाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.