नॅशनल चॅम्पियन बॉडीबिल्डर संकेत काळे यांचा मा.आ.दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सत्कार संपन्न..
---------------------------------------------------------------------------------
सांगोला (दै.पंढरी नगरी न्यूज) मेंगलोर, कर्नाटक येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक मेन चॅम्पियनशिप या स्पर्धेत सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील बॉडीबिल्डर संकेत संजय काळे याने रौप्य पदक जिंकून नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून उज्वल यश संपादन केल्याबद्दल पुणे विभागाचे मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते संकेतचा शाल व पुस्तक देवून सत्कार केला.
यावेळी मा. दत्तात्रय सावंत यांनी संकेतचे व काळे कुटुंबियाचे विशेष कौतुक करून संकेतला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा.चेअरमन श्रीनिवास येलपले, चेअरमन समाधान घाडगे, संचालक मारुतीराव गायकवाड, संचालक दत्तात्रय कदम, सांगोला तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.