विठ्ठल- रुक्मिणीमाता यांचा विवाह सोहळा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थित संपन्न..
-----------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( पंढरी नगरी न्युज) महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजले जाणारे पंढरपूर येथील विठ्ठल- रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात भक्तीमय वातावरणात पार पडला. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी प्रतिवर्षीप्रमाणे करण्यात आली होती.

या निमित्ताने श्री विठ्ठल सभा मंडपात दुपारी 4 ते सायं. 6 या वेळेत रुक्मिणी स्वयंवर कथेचे निरूपण श्रीमद भगवताचार्य साध्वी अनुराधा दिदी यांच्या सुमधुर रसाळ वाणीतून भक्तांना ऐकवण्यात आली. विवाह सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. परंपरेनुसार श्रीस अलंकार परिधान करणे, मंदिरात फुलांची सुंदर आरास करणे, अन्न क्षेत्रामध्ये विशेष भोजन प्रसादाची सोय करून तसेच विठ्ठल- भक्तांना लाईव्ह सोहळा पाहता यावा यासाठी मंदिर समितीच्या वतीने संकेतस्थळ, फेसबुक यांच्यासारख्या प्रसार माध्यमाद्वारे लाईव्ह टेलीकास्ट उपलब्ध करण्यात आले होते.

विवाह सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिकात्मक मूर्तीची पंढरपूर शहरातून श्रीची प्रतीकात्मक मिरवणूक शोभायात्रा काढून हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता यांना विवाह सोहळ्याच्या वेळी विशेष पारंपारिक पोशाख व अलंकार, सोन्याचे बाशिंग परिधान करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यास राज्यातील अनेक साधुसंत, विठ्ठल भक्त तसेच पंढरपूर वाशीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाह या विवाह सोहळ्याची मंगलाष्टका मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी म्हटली.

या विवाह सोहळ्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,सदस्या शकुंतला नडगिरे, ह .भ. प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अँड. माधवी निगडे, ह. भ .प प्रकाश जवंजाळ, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड मंदिरातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.