संत दामाजी सहकारी साखर कारखाण्याचे हंगाम अखेर गळीतास आलेल्या ऊसाचे बिल रु.२७०१/- प्रमाणे बँकेत वर्ग; चेअरमन- शिवानंद यशवंत पाटील

संत दामाजी सहकारी साखर कारखाण्याचे हंगाम अखेर गळीतास आलेल्या ऊसाचे बिल रु.२७०१/- प्रमाणे बँकेत वर्ग; चेअरमन- शिवानंद यशवंत पाटील

------------------------------------------------------------------------------------ 

मंगळवेढा( पंढरी नगरी न्यूजः) - श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२३-२४ मघ्ये हंगाम अखेरपर्यंत गळीतास आलेल्या संपूर्ण ऊसाचे बील प्र।मे।टन रु।२७०१/-प्रमाणे संबंधीत ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांच्या सोयीनुसार धनश्री पतसंस्थेच्या सर्व शाखा, जिजामाता पतसंस्था मंगळवेढा, रतनचंद शहा सह।बँक-मंगळवेढा इत्यादी संबंधीत बँकां/पतसंस्थामधील खात्यामध्ये वर्ग केले आहे. याशिवाय हंगाम अखेरची ऊस तोडणी वाहतुक बिले संबंधीत बँका पतसंस्थाकडे ठेकेदारांचे नांवावर यापुर्वीच वर्ग केलेली आहेत। कारखान्याचे शेती विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून ऊस बिलाची पावती घेवून संबंधीत बँकेतून ऊस बीलाची रक्कम घेवून जावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन . शिवानंद पाटील यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, दामाजी कारखान्याने नुकत्याच पार पडलेल्या सन २०२३-२४ चे गळीत हंगामात ३,८०,५३५मे.टन ऊसाचे गाळप करुन ३,८४,३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या हंगामाकरिता साखर उतारा १०।१०% मिळाला आहे। या हंगामातील ऊसाचे वाढीकरिता मंगळवेढा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसताना, पाण्याच्या गंभीर टंचाईमुळे कार्यक्षेत्रात अपूरा ऊस असतानाही गळीत हंगामाकरिता तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी आमचे संचालक मंडळावर विश्वास ठेवुन दामाजी कारखान्याचे गळीतासाठी मोठया प्रमाणावर ऊस पुरवठा केला. कारखान्यासमोर आर्थिक अडचणी असतानाही सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहणेसाठी हंगाम अखेर गळीतास आलेल्या संपुर्ण ऊसाची बिले, ऊस तोडणी वातहुक यंत्रणेची बिले वेळेत देण्याचे काम आमचे संचालक मंडळाने केले आहे.

चालू गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणेसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके, धनश्री परिवाराचे मार्गदर्शक शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा, जिजामाता पतसंस्थेचे प्रमुख रामकृष्ण नागणे यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे. तसेच श्री संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अँड नंदकुमार पवार, माजी चेअरमन शशिकांत बुगडे, माजी चेअरमन रामचंद्र वाकडे, कारखान्याचे माजी संचालक यादाप्पा माळी, प्रकाश गायकवाड, परमेश्वर आवताडे, जालिंदर व्हनुटगी, जगन्नाथ कोकरे, महादेव फराटे,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप, लतीफ तांबोळी, युनुस शेख, मारुती वाकडे, बबनराव ताड, भारत पाटील, काशिनाथ पाटील, संजय कटट्रे, माणिक पवार, कल्याण रोकडे, शिवाजीराव नागणे, दौलत माने, देवीदास इंगोले, हरी यादव, पप्पु स्वामी, शरद पुजारी, पिंटु शिंदे, रामेश्वर मासाळ, ईश्वर गडदे, गुलाब थोरबोले, गोविंद भोरकडे, राजु गाडवे, दिनेश पाटील यांचेही मार्गदर्शन व सहकार्य मिळाले असलेचे चेअरमन .शिवानंद पाटील यांनी सांगीतले.

याशिवाय कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार यांचे सहकार्यामुळेच हंगाम यशस्वीपणे पार पाडु शकलो. दुष्काळी परिस्थिती असतानाही जिल्हयातील इतर कारखान्याच्या तुलनेत दामाजी कारखान्याचे गाळप चांगले झाले आहे.कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रामाणीकपणे चांगले काम करुन हा गाळप हंगाम यशस्वी करणेसाठी सहकार्य केलेबद्दल समाधान व्यक्त केले.  

याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांचेसह सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते.