आ .आवताडे यांची पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील दुध उत्पादक व दुध संकलन संस्थाचालकांसमवेत बैठक, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मार्गी लावणार.
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा(दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व दुध उत्पादक व दुध संकलन संस्थाचालकांसमवेत मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची आज बुधवार दिनांक २६ जून २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मंगळवेढा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठकीमध्ये दूध उत्पादक व दूध संकलन संस्थाचालकांच्या विविध अडी-अडचणी, दुध दर व इतर विविध विषयांवर आमदार आवताडे हे संवाद साधणार आहेत. दोन्ही तालुक्यातील अनेक शेतकरी व दूध उत्पादक पशुपालकांचे दूध व्यवसाय हे दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रमुख जोडधंदा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या व्यवसायावर आपली उपजीविका भागवणाऱ्या दोन उत्पादकांना व दूध संकलन संस्थाचालकांच्या यावेळी असणाऱ्या विविध समस्या आमदार आवताडे हे जाणून घेणार आहेत.
तरी या बैठकीसाठी पंढरपूर -मंगळवेढा दोन्ही तालुक्यातील सर्व दूर उत्पादक व दूध संकलन केंद्र करणाऱ्या संस्थाचालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांनी केले आहे.