परतीच्या पावसामुळे बळीराजा संकटात, राज्यात आजही पावसाची शक्यता.

परतीच्या पावसामुळे बळीराजा संकटात, राज्यात आजही पावसाची शक्यता.

________________________________________________

पंढरी - नगरी न्यूज : राज्यात अनेक जिल्ह्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यात पुणे, सोलापूर, मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली.

बीड, लातूर, औरंगाबाद, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, परभणी या जिल्ह्यांतही परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाकडून दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून काही भागातून परत फिरेल. मात्र, तोपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात परतीच्या पावसाने बळीराजा संकटात सापडला आहे. अनेक भागात शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस, मूग या पिकांचे मोठं नुकसान झालं असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.

राज्यातील बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे या भागात मोठे नुकसान झालं आहे. परतीच्या पावसामुळे बळीराजाचे हाती आलेले पीक वाया गेले आहे. दरम्यान आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.