सिद्धेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने यंदाचे प्रगतशील शेतकरी , कृषी श्रमिक पुरस्कार जाहीर..

सिद्धेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने यंदाचे प्रगतशील शेतकरी , कृषी श्रमिक पुरस्कार जाहीर..

--------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील ग्रामस्थांच्या निवड समितीच्या वतीने दिवाळी सणा निमित्त पूर्वसंध्येला बलिप्रतिपदा या दिवशी गावातील प्रगतशील शेतकरी व कृषी श्रमिक  महिला शेतकरी यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती निवड समितीच्या वतीने देण्यात आली.

यंदाची दिवाळी दि .२४ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे दीपावली उत्सवानिमित्त शेतकऱ्यांना उत्साहित करण्यासाठी विविध पुरस्कार देऊन त्यांना सन्मान करण्यासाठी बुधवार दि. २६ रोजी सायंकाळी सात वाजता गावातील मारुतीचे मंदिराच्या समोरील पटांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून निवड समितीने गावातील मच्छिंद्र गोपीनाथ जाधव .आप्पा भगवान गोडसे .छगन जगन्नाथ जाधव .दिलीप विष्णू  जाधव यांना प्रगतशील शेतकरी तर कंकूबाई रामचंद्र मोलाने बाळासाहेब राघू फडतरे यांना कृषी श्रमिक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्देवाडी ग्रामपंचायत सरपंच रोहिनी जाधव ह्या उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरकोलीचे प्रगतशील डाळिंब बागायतदार दत्तात्रय भोसले तालुका कृषी अधिकारी भगवान सरडे यांचे शेतीविषयक मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजना या विषयी माहिती मिळणार आहे.

या कार्यक्रमास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक गोकुळ जाधव .वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव. पांडुरंग साखर कारखान्याचे माजी संचालक नागनाथ शिंदे. विठ्ठल सहकारी कारखान्याचे तज्ञ संचालक दशरथ जाधव. पोलीस पाटील दत्तात्रय जाधव .उपसरपंच लक्ष्मण गोडसे तंटामुक्तीचे अध्यक्ष बजरंग जाधव हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी शिंदेवाडी पंचक्रोशीतील शेतकरी बंधू भगिनींनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निवड समितीच्या वतीने करण्यात आले.