पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात संविधान दिवस व श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न...

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात संविधान दिवस व श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न...

-----------------------------------------------------------------------------------

तुळजापूर( पंढरी नगरी न्यूज ) पीएम श्री. जवाहर नवोदय विद्यालयात रविवार दिनांक २६/११/२०२३  रोजी संविधान दिनानिमित्त भारतरत्न, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस.  एच. गायकवाड सर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी व्यासपीठावरती सी. एस .गोमारे, एच. जी .जाधव,  व्ही .एस. जाधव मॅडम उपस्थित होते .या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी होते. याप्रसंगी संविधान दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन संविधान  उद्देशिकेचे वाचन कुमारी सुप्रिया शिंदे या विद्यार्थिनीने केले. त्यानंतर सम्यक जाधव व प्रतीक्षा जाधव या विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व यावर आपले विचार व्यक्त केले.

याप्रसंगी शिक्षक चक्रपाणी गोमारे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगत असताना संविधानाची निर्मिती कशाप्रकारे झाली हे सांगून भारतीय लोकांसाठी संविधान हे दीपस्तंभ आहे .संपूर्ण विश्वामध्ये भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ कसे आहे. यावरती आपले विचार व्यक्त केले. शेवटी विद्यालयाचे उप  प्राचार्य श्री. एस .एच गायकवाड सर विद्यार्थ्यांना संबोधन करताना म्हणाले की कायद्यापुढे सर्व समान आहेत. सर्वांसाठी एकच कायदा आहे .तर या कायद्याची सर्वांनी ज्ञान, माहिती घेऊन भारत देशाला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न करावा .अशा प्रकारचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. शेवटी २६/११/२००८ रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरहंता  वाघमारे व सरस्वती घंटे या मुलींनी केले.