बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात शिक्षण महर्षी डॉ.मामासाहेब जगदाळे यांची जयंती उत्साहात साजरी...
----------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंढरी नगरी न्यूज ) येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये आपल्या तालुक्यात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविणारे थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची १२१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमता प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
त्यावेळी ग्रंथालयाचे कार्यवाह मधुकांतजी ठोकळ , उपाध्यक्ष धैर्यशील देशमुख समाजसेवक सुहास सुतार, वृक्षमित्र सुनिल फल्ले, रामचंद्र झिंगे, सोमनाथ गायकवाड, अनिल गरड इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले.यावेळी सभासद,वाचक व बालवाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.