श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे पाणपाईचे उद्घघाटन
-----------------------------------------------------------------------------------
बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज)- येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे "पाणपाई" चे वाचनालया समोर प्रमुख पाहुणे पद्ममभाई कांकरिया यांच्या शुभहस्ते उद्घघाटन करण्यात आले.यावेळी श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ,संचालक धिरज कुंकूलोळ, आनंद सुराणा, प्रमोद भंडारी, श्री जैनाश्रमचे अध्यक्ष जयचंद सुराणा ऑ.सेक्रेटरी ॲड.दिनेश श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष चंद्रकांत कोठारी, गौतमचंद बोथरा, पारस शिंगवी, इंद्रपाल कुंकूलोळ, आशोक सुराणा, पत्रकार विजय निलाखे व सर्व श्रावक व पदाधिकारी, संचालक मंडळ, वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
यावेळी उद्घघाटक म्हणून लाभलेले प्रमुख पाहुणे पद्ममभाई कांकरिया यांनी त्यांच्या ६८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी ₹ ६,८००/-पाणपोई साठी देणगी देण्यात आली. त्यांचे वाचनालया तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच त्यांना वाढदिवसा निमित्त खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव,क्लार्क विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.